
अहमदनगर :
विकासाची पंढरी म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामती भागाचा उल्लेख केला जातो. त्याच बारामतीकरांनी नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नगरकरांच्या निमंत्रणास पवार साहेब कसा प्रतिसाद देतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
आघाडीच्या जागावाटपात नगराची जागा राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, कॉंग्रेसचे सुजय विखे यांनी या जागेवर हक्क सांगून प्रचारात आघाडी घेतली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीकडून कोण उमेदवारी करणार याबद्दल स्पष्टता नाही. अशावेळी स्वतः पवार साहेबांनीच माढा (जि. सोलापूर) मतदारसंघातून लढण्याऐवजी नगर दक्षिणेतून लढण्याची मागणी आता नगरकर करू लागले आहेत. राष्ट्रवादीसाठी महत्वाचा असलेला नगर मतदारसंघ पवार साहेबांनी लढविल्यास सुजय विखे यांना आपोआपच माघार घ्यावी लागेल.
माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी यापूर्वीच पवार साहेबांनी नगरमधून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता महाराष्ट्र युथ कौन्सिलचे अध्यक्ष रणजीत बाबर यांनीही या इच्छेचा पुनरुच्चार केला आहे. माढा येथील एकंदरीत परिस्थिती पाहता व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार पवार साहेब नगरला पसंती देऊ शकतात असेच अनेकांना वाटते. मात्र, अशावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा गट काय करणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.
Be the first to comment