मोदींच्या विरोधात विरोधी मुख्यमंत्री आक्रमक

दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर देशातील बहुसंख्य मुख्यमंत्री नाराज आहेत. देशाचा संघराज्य ढाचा लक्षात न घेताच मोदी सरकार मनमानी करीत असल्याचा आरोप करीत आतापर्यत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याविरोधात एल्गार पुकारला होता. आज आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले.

राष्ट्र आणि राज्य अशा दोन्हींची जबादारी व कर्तव्ये भारतीय लोकशाहीने ठरवून दिलेली आहेत. त्यानुसार संघसुची, राज्यसुची आणि संयुक्त सूची लक्षात घेऊन सर्वांनी संविधानिक चौकटीत काम करणे अपेक्षित आहे. मात्र, तीच चौकात मोदी सरकारने मोडल्याचा आरोप विरोधी मुख्यमंत्री करीत आहेत. तसेच इतरही काही मागण्यांमुळे सध्या केंद्र व राज्य यांचे संबंध ताणले आहेत. तेच तुटू न देता सामोपचाराचे होण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यासाठी मोदी सरकारने पावले उचलण्याची गरज विचारवंत व अभ्यासक व्यक्त करीत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*