चौकीदार चोरच आहेत : राहुल गांधी

लखनौ :

देशातील तरुण आणि शेतकरी यांचा विश्वासघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. फ़क़्त उद्योजक अनिल अंबानी आणि इतरांचा फायदा त्यांनी केला आहे. त्यामुळे चौकीदार चोरच आहेत, अशी घणाघाती टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

लखनौ येथील सभेत बोलताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राफेल डील आणि शेती प्रश्नावर मोदी सरकारवर टीका केली. तरुणांना साद घालताना त्यांनी वाढत्या बेरोजागारीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, उत्तरप्रदेश येथून कॉंग्रेस पार्टीची सुरुवात झाली होती. त्याच राज्यात आम्ही पक्ष पुन्हा सत्तेवर आणल्याशिवाय शांत राहणार नाहीत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*