भाजपचा झेंडाच राष्ट्रवादाचे प्रतिक..!

दिल्ली :

लोकसभा निवडणूक जशी जवळ येत आहे त्यानुसार पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपने राष्ट्रवादाचा मुद्दा चेताविण्याची टायरी केली आहे. त्यानुसार आज पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी ट्विट करून अशाच भाषेत भाजपच्या झेंड्याला राष्ट्रवादाचे प्रतिक म्हणून दामटले आहे.

तिरंगा झेंडा भाजपच्या मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अमान्य असल्याची टीका अनेकदा होते. त्याच अर्थाचे ट्विट शाह यांनी केले आहे. भाजपचा झेंडा विकास, विश्वास आणि राष्ट्रवाद याचे प्रतिक असून मोदींच्या युगात तुष्टीकरण, जातीयवाद आणि परीवारवाद नक्की संपण्याचा विश्वासही त्यांनी दिला आहे. मात्र, तिरंगा ध्वज असतानाही राष्ट्रवादासाठी पुन्हा नवा कमळ चिन्हाचा झेंडा का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होईल असेच चित्र आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*