मोदी आहेत अंबानींचे मिडल मॅन : गांधी

मुंबई :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सोडत नाहीत. राफेल डीलसह शेतकरी व तरुणांच्या प्रश्नावर सातत्याने प्रश्न उपस्थित करून गांधी यांनी भाजपच्या गोटात अशांतता निर्माण केली आहे. आजही मोदी यांना उद्योजक अनिल अंबानी यांचे मिडल मॅन असे संबोधित करून गांधी यांनी टीका केली.

राफेल करारासह रिलायन्स कंपनीच्या भाल्यासाठीच मोदी सरकार आपली धोरणे राबवीत असल्याचे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. त्यासाठी विविध पुराव्यांचा दाखला देत हा पक्ष आणि त्यांचे नेते मोदी यांना लक्ष्य करीत आहेत. आजही गांधी यांनी मिडल मॅन असे मोदींना म्हटले आहे. तसेच या पक्षाने देशभरात ट्विटर आणि सोशल मिडीयावर हा ट्रेंड बनविला आहे. #MiddlemanModi या ट्रेंडला देशभरातून मोठा प्रतिसादही मिळत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*