राहुल राफेलवर खोटे बोलतात : टाईम्स नाऊ

दिल्ली :

चौकीदार चोर है आणि मिडल मॅन अशी टीका करून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. मात्र, गांधीची ही टीका निराधार असून ते सपशेल खोटे बोलत असल्याचा मुद्दा घेत टाईम्स नाऊ या इंग्रजी वाहिनीने स्पेशल शो घेतला आहे.

राहुल राफेल फेक न्यूज अर्थात #rahulrafalefakenews असे हॅशटॅग चालवून या वृत्तवाहिनीने या कार्यक्रमाचा ट्रेंड बनविला आहे. त्यास देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी खोटे आरोप करून निराधार मुद्यांवर बोलून देशवासीयांची फसवणूक तर करीत नाहीत ना, असा प्रश्न या वाहिनीने उपस्थित केला आहे. त्याला भाजपच्या भक्तांनी ट्रेंड केले आहे. तर, विरोधी विचारांच्या नागरिकांनी याच वाहिनीवर टीकेची झोड उठविली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*