ब्रॉयलर चिकनचा धोका यामुळे वाढतो..!

ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेटीव्ह जर्नालिझम या जगप्रसिद्ध संस्थेने भारत केलेल्या शोध पत्रकारीतेत पोल्ट्री व्यवसायाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आपल्याकडील ब्रॉयलर चिकन खाण्यास पूर्णपणे अयोग्य असल्याचा अहवाल या पत्रकारिता संस्थेने डिसेंबर २०१८ मध्ये प्रकाशित केलेला आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या रुग्णांना जागविण्यासाठी वापरले जाणारे ‘कॉलिस्टीन’ हे प्रतिजैवक अर्थात एंटी बायोटिक देऊन ब्रॉयलर कोंबडीला वेगाने वाढविले जात असल्याचे त्यात म्हटले आहे.

भारतात बॉयलर कोंबड्यांची चांगली व लवकर वाढ होण्यासाठी कुक्कुटपालन व्यवसायातील चालकांकडून सर्रास ‘कॉलिस्टीन’ दिले जाते. तीन महिन्यात कापण्यायोग्य होणारी कोंबडी यामुळे एक महिना आगोदरच कापण्यासाठी तयार होते. वेंकीज कंपनीसह अनेक कंपन्यांनी याचा वापर केला जात असल्याचे मान्य केल्याचे या अहवालात स्पष्ट म्हटले आहे. मॅकडोनाल्ड, केएफसी, पिझ्झाहट आदी जगप्रसिद्ध कंपन्यांच्या भारतीय साखळी उपहारगृहात असेच धोकादायक चिकन वापरले जात आहे. युरोपीय महासंघाने २००६ मध्ये ‘कॉलिस्टीन’वर बंदी आणलेली आहे. आपल्याकडे मात्र हे सहजपणे उपलब्ध असून याचा वापर पोल्ट्री व्यवसायात मोठ्या प्रमाणावर होत आहे. इतर काही खाण्यास अयोग्य घटक देऊनही ब्रॉयलर चिकनचे उत्पादन घेतले जाते. आता त्यात ‘कॉलिस्टीन’ या धोकादायक घटकाची भर पडली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*