५ / ६ मार्चपासून आचारसंहिता..?

दिल्ली :
लोकसभा निवडणुकीसाठी आता आघाडी आणि युतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. पुढील ४-५ दिवसांत देशभरात आदर्श आचारसंहिता लागू होण्याच्या शक्यतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारसह युतीमधील घटकपक्ष आणि विरोधी काँग्रेस आघाडीसहित तिसऱ्या आघाडीची तयारी केलेल्या पक्षांनीही तयारी पूर्ण केली आहे. मागील निवडणुकीची (लोकसभा निवडणूक २०१४) आचारसंहिता ५ मार्च २०१४ रोजी लागू झाली होती. आताही लोकसभा निवडून २०१९ साठीची आचारसंहिता ५ किंवा ६ मार्च आणि त्यातही जास्तीतजास्त वाढ होऊन ९ मार्चपर्यंत लागू होण्याची शक्यता आहे.

२०१४ मध्ये काँग्रेस पक्षाच्या विरोधातील लाटेत भाजपाला भारतीय जनतेने बहुमताचे सरकार स्थापन करण्याची संधी दिली होती. त्यावेळी असणारी विरोधी लाट आता कोणत्याही एका पक्षाच्या विरोधात किंवा बाजूने नाही, असेच सर्वेक्षणातून पुढे येत आहे. पाच वर्षांपूर्वीची निवडणूक ९ टप्प्यांत झाली होती. ७ एप्रिल ते १२ मे २०१४ या कालावधीत ९ टप्प्यांत झालेल्या या मतदानाची मोजणी १६ मे २०१४ ला झाली होती. त्यावेळी देशात सत्तांतर होऊन भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर काम करण्याची संधी दिली. यंदा मात्र, कोणाची सत्ता येणार याबद्दल मीडिया रिसर्च करणाऱ्यांमध्ये एकमत नाही. त्यामुळेच यंदा देशात प्रादेशिक पक्षांचे महत्व वाढून पुन्हा एकदा आघाडी किंवा युतीचे सरकार येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मागील निवडणुकीच्या तारखा लक्षात घेता ५ ते ९ मे २०१९ या कालावधीत कधीही आचारसंहिता लागू करण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग करू शकतो असाच अंदाज अनेकजण व्यक्त करीत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*