आघाडीचे मिशन २०:२० जोरात

पुणे :

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील ४-५ दिवसात लागण्याची चिन्हे आहेत. अशावेळी आघाडीची मोट बांधून त्याद्वारे महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या २०:२० जागा निवडून आणण्याची तयारी धुरीणांनी केली आहे.

काहीही करून शिवसेना-भाजप युतीला केंद्र व राज्याच्या सत्तेतून हद्दपार करण्यासाठी यंदा आघाडी जोमाने तयारीला लागली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंबेडकर गटास समवेत घेऊन अंतिम जागावाटप ५ मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी आघाडीचे धुरीण कामाला लागले आहेत. राज्यातील ४८ पैकी किमान ४० जागा जिंकून भाजपच्या मनसुबा धुळीत मिळवण्याची आणि देशात सर्वसमावेशक सरकार देण्याची तयारी आघाडीने केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*