चीनच्या विरोधात ‘एफएओ’च्या निवडणूकीत भारताचा ‘हा’ उमेदवार

दिल्ली :

जागतिक अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) प्रमुख पदासाठी भारताने नीती आयोगाचे सदस्य डॉ. रमेश चंद यांना संधी देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार या पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत भारताचे प्रतिनिधी म्हणून डॉ. चंद हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. चीनसह इतर तीन देशांनी यासाठी आपापले प्रतिनिधी निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून दिलेले आहेत.

जगातील १९४ सदस्य देश या संघटनेचे सभासद आहेत. रोम येथील मुख्यालय असलेली ही संस्था संयुक्त राष्ट्र संघटनेशी निगडीत एक प्रतिष्ठित संस्था आहे. २०११ पासून ब्राझील देशातील अर्थतज्ञ जोस सिल्व्हा या संघटनेच्या डायरेक्टर जनरल या पदावर आहेत. मात्र, त्यांचा कार्यकाळ संपल्याने आता जून महिन्यात यासाठी नवीन प्रमुख व्यक्ती निवडण्यात येणार आहे. त्यासाठी डॉ. चंद यांना भारत देशाचे प्रतिनिधी म्हणून संधी देण्यात आली आहे.

या निवडणुकीत चीनचे क्यू डोंग्यू, कमेरुन देशाचे मेडी मोन्ग्युई, फ्रान्सच्या कथरीन गेसलीन आणि जॉर्जिया देशाचे दावित किर्वालीद्झे हे उमेदवार डॉ. चंद यांच्या विरोधात असतील. चीन, फ्रांस आणि भारतीय प्रतिनिधीपैकी कोणाला यासाठी संधी मिळणार हे जगभरातील १९४ देश ठरविणार आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*