‘मोदी है तो मुमकिन है’… अच्छे दिन..!

दिल्ली :

पाच वर्षांपूर्वी विकास आणि त्यातून सर्वांना अच्छे दिन येतील असा विश्वास देत भाजपचे सरकार सत्तारूढ झाले होते. मात्र, आता काळ बदलला आहे. त्यामुळेच विकास हा न झेपणारा मुद्दा पुन्हा न हाती घेता राष्ट्रवाद आणि नवा भारत असा मुद्दा घेऊन भाजपची टीम लोकसभा निवडणुकीस सामोरी जाणार आहे. त्यासाठी ‘मोदी है तो मुमकिन है’ असे विशेष घोषवाक्य देऊन अबकी बार… फिरसे मोदी सरकार… हा नारा भाजप बुलंद करणार आहे.

शेतकरी आत्महत्या आणि ग्रामीण भागाचे वास्तव लक्षात न घेता शहरी भागातील श्रीमंतांना लक्ष्य करून भाजपची टीम काम करीत असल्याचा आरोप होत आहे. धार्मिक ध्रुवीकरण आणि जातीयवाद फोफावण्यात भाजपचा हात असल्याचा आरोप करीत देशभरातील समविचारी पक्ष भाजपच्या विरोधात एकवटले आहेत. भाजपनेही सुमारे ४० पक्षांची मोट बांधून त्यास प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवली आहे. त्यासाठी आताचा पुलवामा दहशतवादी हल्ला आणि भारताने पाकिस्तानला दिलेले प्रत्युत्तर असे मुद्दे पुढे रेटीत ‘मोदी है तो मुमकिन है’ असा नारा भाजपने दिला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*