हार्दिक पटेल ‘त्या’ जागेवरून निवडणूक लढणार..!

गांधीनगर :

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शाह साहेबांना गृहराज्यात जोरदार लढत देण्यासाठी कॉंग्रेस पक्ष जोमाने कामाला लागला आहे. त्यानुसार पटेल आरक्षणासाठी लढणारे तरुण-तडफदार नेते हार्दिक पटेल यांना पक्षात घेऊन जामनगर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्ष उमेदवारी देणार असल्याचे समजते.

गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी 25 वर्षांपेक्षा कमी वाय असल्याने हार्दिक पटेल निवडणूक लढवू शकत नव्हते. मात्र, त्यावेळी त्यांनी कॉंग्रेस पक्षाला मदत करताना मोदी-शाह यांच्या जोडीला पळायला लावले होते. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हार्दिक पटेल निवडणूक लढवून खासदार होण्यासाठी तयार झाल्याची बातमी टाईम्स नाऊ यांनी ब्रेकिंग केली आहे.

२०१५ पासून हार्दिक पटेल यांनी गुजरातमध्ये भाजप सरकारला जेरीस आणले आहे. त्याचाच भाग म्हणून जामनगर येथील भाजप खासदार पुनमबेन मादम यांच्या विरोधात पटेल निवडणूक उतरण्याची चिन्हे आहेत. 12 मार्च रोजी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पटेल कॉंग्रेसवासी होण्याची शक्यता आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*