विखे गेल्यास आघाडीला बसेल मोठा झटका

अहमदनगर :

आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा नगर जिल्ह्यात सुरू आहे. विखे कुटुंबियांना जर काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करून खरोखरच लोकसभा निवडणूक लढविली तर, राज्यात आघाडीला मोठा झटका आणि निकालात फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

काँग्रेसला जागा देऊन किंवा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून अशा कोणत्याही पद्धतीने डॉ. सुजय विखे उमेदवारी करण्यास तयार आहेत. मात्र, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंडळींनी त्यांना विरोध केला आहे. त्यामुळे उमेदवारी मिळत नसल्याने विखे कुटुंबीय भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या येत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्याशी डॉ. सुजय यांची चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, जर असे झालेच तर विखे यांच्यासह राज्यातील काँग्रेसची मोठी ताकदही भाजपवासी होईल. त्याने भाजपला मोठा फायदा मिळेल, तर आघाडीला मोठा झटका बसेल असे राजकीय धुरीणांचे म्हणणे आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*