
मुंबई :
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली असून महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान घेण्याचे नियोजन केंद्रीय निवडणूक आयोगाने केले आहे. त्यानुसार देशभरात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर २३ मे २०१९ रोजी निवडणूक निकाल जाहीर होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा केली. त्यानुसार महाराष्ट्रात ११, १८, २३ व २९ एप्रिल या चार दिवशी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. इतर राज्यातील मतदान प्रक्रिया वेळेत व शांततेत पार पाडून २३ मे या दिवशी देशातील निकाल जाहीर होऊन निवडणूक चित्र स्पष्ट होणार आहे.
Be the first to comment