३९ दिवसांत सात टप्पे आणि २३ मे रोजी निकाल..!

मुंबई :

सोळाव्या लोकसभेची मुदत ३ जूनला संपत असून त्यापूर्वी २३ मे रोजी देशातील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. देशात पुढील ३९ दिवस आचारसंहिता आणि निवडणुकीच्या धामधुमीचे असतील. सात टप्प्यात सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

दि. ११ एप्रिलला पहिल्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडेल, तर अंतिम सातवा टप्पा १९ मे रोजी असेल. त्यानंतर चार दिवसांनी निवडणूक निकाल जाहीर होऊन देशात कोणाला सत्तेवर येण्याची संधी मिळणार आहे याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

निवडणूक निकालाचे टप्पे व तारखा पुढीलप्रमाणे :

पहिला : ११ एप्रिल

दुसरा : १८ एप्रिल

तिसरा : २३ एप्रिल

चौथा : २९ एप्रिल

पाचवा : ६ मे

सहावा : १२ मे

सातवा : १९ मे

निवडणूक निकाल : २३ मे

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*