मोदी व संघ-भाजप भित्रे : गांधी

दिल्ली :

भीती आणि द्वेष या विचारांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांचे राजकारण सुरू आहे. आतापर्यत अनेक निवडणुकीत मी पाहिलेय की कोणी सक्षमपणे उभे राहिले की पंतप्रधान नरेंद्र मोदी अपोआप बाजूला होतात, अशी टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

दिल्लीमधील कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले की, गुजरात, मध्यप्रदेश आणि छत्तिसगढ येथील विधानसभा निवडणुकीत मी भाजप, संघ आणि मोदी यांचा चांगला अनुभव घेतला आहे. स्वतःला ५६ इंची छातीचे म्हणवून घेणारे मोदी प्रत्यक्षात खूप भित्रे आहेत. आपण किंवा पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचीही त्यांना भीती वाटते. सामाजिक तेढ निर्माण करून पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा ते प्रयत्न करतील. मात्र, आपण तो हाणून पडणार आहोत. कारण जनता कॉंग्रेसबरोबर आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*