मोदी म्हणजे प्रचारमंत्री : हार्दिक

अहमदाबाद :

आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे फ़क़्त प्रचारमंत्री आहेत. भारतीय सेना असोत की दहशतवाद असो, त्यावर फ़क़्त प्रचारी थाटात बोलण्याचे काम मोदी करीत आहेत. चुनावी जुमला फेकून ते फ़क़्त जनतेची दिशाभूल करीत आहेत, अशी टीका पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी केली आहे.

गुजरातमध्ये कॉंग्रेसला किमान १२ जागा मिळण्याचा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला. आज तक वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की, अच्छे दिन ही जुमलेबाजी आता गुजरात आणि देशात पुन्हा यशस्वी होणार नाही. फ़क़्त पोकळ आश्वासने देऊन भाजप किती दिवस फसविणार आहे? भारतीय जनता विचारी आणि सुज्ञ आहे. त्यांनी आता पुन्हा एकदा कॉंग्रेस पक्षावर विश्वास व्यक्त केला आहे. देशातील विकास आतापर्यंतच्या सर्व सरकारांनी मिळून केलेला आहे. त्यात कॉंग्रेसला देशाच्या विकासात मोठा हातभार लावण्याची संधी मिळाली. जनतेला हे सर्व माहित आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*