हा पक्ष देणार ४३ % महिलांना उमेदवारी

कलकत्ता :

भाजपचे अतिक्रमण रोखण्यासाठी पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेस पक्ष जोरदार सक्रीय झाला आहे. त्यानुसार या पक्षाच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४३ टक्के उमेदवारी देण्याची मोठी घोषणा केली आहे.

पक्षाच्या बैठकीत त्यांनी सर्वांना याबद्दल माहिती देताना नंतर जाहीर भाषणातही याबद्दल सुतोवाच केले. त्यांच्या या महिला सक्षमीकरणाच्या मुद्याचे देशातील विचारी माणसांनी स्वागत केले आहे. एकूणच यानिमित्ताने बंगालमध्ये भाजपला कोणतीही स्पेस नसल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न ममता बनर्जी करीत आहेत. तेथील सर्व ४२ जागांवर तृणमूल कॉंग्रेसचे उमेदवार विजयी होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*