पाच जागांसाठीचे उमेदवार जाहीर

अहमदनगर :

राष्ट्रीय काँग्रेसने पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून त्यात महाराष्ट्रातील पाच जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

सोलापूरच्या जागेसाठी अपेक्षेप्रमाणे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली आहे. तर, दक्षिण मुंबई मतदार संघातून माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा, गडचिरोली-चिमूर मतदारसंघात माजी आमदार डॉ. नामदेव उसंडी, मध्य मुंबई येथून माजी खासदार प्रिया दत्त आणि नागपूर या जागेवरील भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात माजी खासदार नाना पटोले यांना काँग्रेसने संधी दिली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*