कांद्याला प्रतिक्विंटल ८०० रुपये अनुदान..!

भोपाल :

मध्यप्रदेश राज्यातील काँग्रेस सरकारने तेथील स्थानिक शेतकऱ्यांना कांद्यामुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन प्रतिक्विंटल ८०० रुपयापर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. हा मास्टर स्ट्रोक खेळून त्यांनी तेथील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हात दिला आहे.

महाराष्ट्र राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने मोठ्या थाटात प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देऊन त्याचाही जोरदार डांगोरा पिटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी त्यानंतर जोरदार जाहिरातबाजी केली. मात्र, मध्यप्रदेश येथील मुख्यंमत्री कमलनाथ यांच्या सरकारने थेट ८०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देऊन शेतकऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुश केले आहे.

८०० रुपये दराने कांद्याची खरेदी झालेली नसल्यास त्याचा फरक आणि वाहतूक व साठवणूक याच्याही ७५ टक्क्यापर्यंत अनुदान मध्यप्रदेश सरकार देत आहे. सत्तेवर आल्यावर पहिल्याच बैठकीत शेतकरी कर्जमाफी केल्यानंतर आता कमलनाथ सरकारने कांद्यालाही उत्पादन खर्चापेक्षा जास्त भाव देण्याचे आश्वासन पूर्ण केले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*