दुर्दैवी बातमी | शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र अव्वल

मुंबई :

देशात सर्वाधिक आयकर भरणारे राज्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र राज्यात मुंबईच्या बाहेरील ग्रामीण भागाचे वास्तव भयाण आहे. विदर्भ, मराठवाडा व खानदेश भागातील शेतकरी आत्महत्या करीत असून या दुर्दैवी फेऱ्यामध्ये अडकलेल्या राज्यातही महाराष्ट्र अव्वल आहे.

मागील तीन वर्षांपूर्वी (2014 ते 2018) राज्यासह देशभरात शेतकरी आत्महत्या होत होत्या. मात्र, या तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग अधिक नकारात्मक मानसिकतेच्या गर्तेत गेल्याचे आकडेवाडीवरून दिसत आहे. मागील तीन वर्षात महाराष्ट्रात 8651 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर, त्या खालोखाल मध्यप्रदेश 4098 आणि कर्नाटक 2448 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली आहे. अशी एक पोस्ट सध्या जोरात व्हायरल होत आहे. आतापर्यंत आत्महत्या झालेला आकडा सरकारने जाहीर केला आहे. त्यात महाराष्ट्र पुढेच होता. या तीन वर्षांच्या आकडेवारीतही राज्य पुढे आहे, हे दुर्दैव.

शेतमालाला मिळणारे तोट्यातील भाव आणि वाढत्या उत्पादन-खर्चाच्या फेऱ्यात भारतीय शेतकरी अडकला आहे. सरकारी नाकर्तेपणाची त्यात भर पडल्याने आत्महत्या वाढत असल्याचे मत शेतकरी संघटनांचे आहे. त्याचवेळी 2022 पर्यंत उत्पादन दुप्पट करण्यासाठी प्रयत्नशील असलेले केंद्र सरकार अजूनही त्याची ठोस रूपरेषा सादर करू शकले नाही. हे देशाचे दुर्दैव आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*