मोदींच्या ट्रेंडला ‘हार्दिक’ शुभेच्छा..!

मुंबई :

मागील निवडणुकीत चहावाला आणि अच्छे दिन याचा ट्रेंड निर्माण करून निवडणूक जिंकलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संघ-भाजपच्या टीमने यंदा मै भी चौकीदार नावाचा ट्रेंड आणला आहे. त्याला शुभेच्छा देण्यासाठी अवघा भाजप एकवटला असतानाच कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्ष गोंधळले होते. मात्र, पाटीदार नेता हार्दिक पटेल याने बेरोजगार नावाचा ट्रेंड आणून भाजपच्या ट्रेंडमधील हवा काढून घेतली आहे.

मोदी व भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी चौकीदार असे लिहून ट्विटरवर ट्रेंड केला. त्यावर समस्त भाजप नेते आणि मोदींच्या कार्यकर्त्यांनी चौकीदार लिहून त्यात सहभाग नोंदविला. राफेल मुद्यावर चौकीदार चोर है, असे म्हणणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांसह राहुल गांधी यांना उत्तर म्हणून हा ट्रेंड खूप गाजला. मात्र, हार्दिक पटेल या तरुण नेत्याने मोदींच्या टीमच्या ट्रेंडमधील हवा फुस्स करून टाकली आहे. बेरोजागारी हा महत्वाचा मुद्दा असल्याकडे लक्ष वेधून एकाच झटक्यात हार्दीकने मोदी-शाह यांच्या टीमला झटका दिला आहे. त्याचे सोशल मीडियातून कौतुक होत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*