म्हणून हार्दिकच्या ट्रेंडला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई :

कॉंग्रेसच्या चौकीदार चोर है या ट्रेंडला उत्तर देण्यासाठी मागील २०१४ च्या निवडणुकीची भावनिक खेळी खेळत भाजपने मै भी चौकीदार नावाचा ट्रेंड आणला. पहिल्या दिवशी त्याचे दमदार स्वागतही झाले. अनेकजण यावर व्यक्त होताना गोंधळले. मात्र, गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी त्यावर कडी करीत चौकीदार विरुद्ध बेरोजगार असा ट्रेंड ट्विटरवर आणून प्रत्युत्तर दिले. देशातील वाढती बेरोजगारी हाच मुद्दा केंद्रस्थानी आणून हार्दिक पटेल यांनी भाजपची खऱ्या अर्थाने गोची केली आहे.

मागील पाच वर्षांत नोटबंदी आणि जीएसटी व इतर काही सरकारी हस्तक्षेपामुळे देशातील अर्थकारण धोक्यात आल्याचे हजारो अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. त्यापेक्षाही जास्त अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या टीमने प्रसिद्ध होऊ दिले नसल्याचे अनेकांनी म्हटले आहे. एकूणच देशातील आर्थिक प्रश्न, बेरोजागारी आणि शेतकरी व कष्टकरी यांचे प्रश्न यातून पुलवामा या दुर्दैवी घटनेने भाजपला पुन्हा अछ्हे दिनचे स्वप्न दाखविले. दहशतवादी हल्ल्याचे राजकीय लाभ उठविण्यासाठी चौकीदार हाच ट्रेंड भाजपने केला. मात्र, त्यापेक्षा मोठा मुद्दा देशातील बेरीजागारीचा आहे. त्याकडे साहजिकच हार्दिक पटेल यांनी लक्ष वेधले. हार्दिक यांच्या ट्रेंडला त्यामुळेच जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*