उत्तरप्रदेशमध्ये भाजपविरोधात ‘साथी’

दिल्ली :

देशातील सर्वात मोठ्या उत्तरप्रदेश राज्यात भाजपची एकहाती सत्ता आहे. तसेच तिथे सध्या ८० पैकी भाजपचे ७२ खासदार निवडून आलेले आहेत. अशा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात भाजपची सत्ता खालसा करण्यासाठी ‘साथी’ एकवटले आहेत.

महागठबंधन से महापरिवर्तन असा नारा देत माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांनी बहुजन समाज पार्टीच्या आघाडीतर्फे भाजपला काटशह देण्याचा प्रयत्न केला आहे. यंदा या राज्यात भाजपसह कॉंग्रेस आणि या साथीच्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही जास्तीतजास्त जागा पटकाविण्याची तयारी ठेवली आहे. त्यात साथी जोरात असल्याने कॉंग्रेसला कितपत यश मिळणार याकडे देशाचे लक्ष लागणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*