Blog | मग पहा मतदानाची ताकद…

आपल्या सगळ्यांनाच ‘राजकारण’, ‘राजकीय नेते’ आणि ‘निवडणुकीचे उमेदवार’ म्हणजे ‘वाईट’, ‘गुंड-पुंड’, ‘रक्तपिपासू drakula’, ‘ढोंगी’, ‘नाटकी’ अशाप्रकारचे असल्याचा गैरसमज आहे…

अहो, हे राजकीय नेतेही आपल्यातलेच असतात… मतदारांतून निवडून जाण्यापूर्वी त्यांचा इतिहास आणि वागणूकही आपल्याला माहीत असतेच ना? मग, सगळेच राजकारणी वाईट कसे असतील? हेच सत्य असल्यास मग “सगळेच मतदारही तसेच आहेत का”? उत्तर होकारार्थी असल्यास हरकत नाही!
पण नकारार्थी असल्यास, हे बदलण्याचे माझ्यासह तुमचेही कर्तव्य नाही का????

माणूस कधीही वाईट नसतो… त्याला परिस्थितीनुसार वागावे लागते… चांगल्या विचाराने आपण मतदान केल्यास, कदाचित ‘समाजकारणी’ असणारा माणूस आपण निवडून आणू शकतोय… त्यासाठी प्रत्येकाने आपल्या ‘मताची किंमत’ लक्षात घेऊन विचारपूर्वक मतदान करण्याची गरज आहे… मग करणार ना अशा सकारात्मक विचाराने ‘चांगल्या’ राजकाण्यास मतदान???

आणि हो, असा चांगला उमेदवार नाहीच मिळाला तर, बिनधास्त ‘नोटा’ अर्थात ‘मतदानाचा नकाराधिकार’ वापरा… मग पहा आपल्या ‘मत’दानाची खरी ताकद…!!!

@सौ. माधुरी सचिन चोभे, व्यवस्थापकीय संपादक, कृषीरंग

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*