राहुल गांधींच्या विरोधात इराणी; अडवणींचा पत्ता कट

दिल्ली :

भाजपने लोकसभा उमेदवारांची बहुप्रतिक्षित पहिली यादी अखेर जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणशी येथून लढणार असून अमेठी या मतदारसंघात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा भाजपने पत्ता कट केल्याचे दिसते.

गुजरातमध्ये गांधीनगर मतदारसंघात अडवाणी यांच्याऐवजी आता भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनाच भाजपने संधी दिली आहे. काँग्रेस अध्यक्ष गांधी यांना मतदारसंघात अडकून ठेवण्यासाठी भाजपने इराणी यांना यंदा ताकदीनिशी लढण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे अमेठी येथील ही लढत देशभरात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*