राहूल गांधी लढणार दोन मतदारसंघात

दिल्ली :

2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी गुजरातसह उत्तरप्रदेश राज्यातील वाराणशी येथूनही उमेदवारी करीत दोन्ही ठिकाणी विजय मिळविला होता. यंदा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अशाच पद्धतीने उत्तरप्रदेशात अमेठी आणि केरळातील वायनाड या दोन मतदारसंघात उमेदवारी करीत आहेत.

काँग्रेसकडून आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राहूल गांधी हे अमेठी सोबत वायनाड लोकसभा मतदारसंघात निवडणुक लढवणार आहेत असे सांगण्यात आले. वायनाड हा मतदारसंघ केरळमधे येतो. ऊत्तर आणि दक्षिण भारताचे नाते दृढ करण्यासाठी त्यांनी दोन ठिकाणाहून लढण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी काँग्रेस नेते ए.के.अँटोनी यांनी राहूल यांच्या या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*