बिहारी बाबू करणार भाजपच्या प्रसाद यांना ‘खामोश’..!

पाटणा :

आतापर्यंत लालकृष्ण अडवाणी गटाकडून भाजपत असताना काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना ‘खामोश’ करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी आता अधिकृतपणे पक्षबदल केला आहे. त्यानुसार आता पाटण साहिब येथून ते काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत.

भाजपने या जागेवर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी देत सिन्हा यांना खामोश करण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्यानुसार या जागेवर आता प्रसाद विरुद्ध सिन्हा ही जोरदार धुमश्चक्री रंगणार आहे. मात्र, यात नेमका कोण कोणाला खामोश करतोय त्यावर त्यांचे पुढील राजकारण ठरणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*