अबब.. या तीन कंपन्यांचे बाजारमूल्य भारतापेक्षा जास्त..!

दिल्ली :
जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताची ओळख निर्माण झाल्याने सर्व भारतीयांना अभिमान वाटत आहे. हा क्षण आहेही तसाच. मात्र, जागतिक आर्थिक दृष्टीने पाहता अमेरिकेतील बलाढ्य अशा फक्त तीन कंपन्यांचे बाजारमूल्य भारतीय अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त आहे. या कंपन्या आहेत ऍपल, अमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट..!

जगात फक्त चार कंपन्यांचे बाजारमूल्य एक लाख कोटी डॉलरपेक्षा जास्त आहे. त्यात या तीन अमेरिकी व चीन सरकारच्या पेट्रो चायना या चार कंपन्या आहेत. यापूर्वी फक्त तीन कंपन्यांनी एक लाख कोटी डॉलर (70 लाख कोटी रुपये) हा टप्पा पार केला होता. त्यात आता बिल गेट्स यांची मायक्रोसॉफ्ट समाविष्ट झाली आहे.

भारताच्या अर्थसंकल्पीय किमतीनुसार 2.7 लाख कोटी डॉलर म्हणजे 188 लाख कोटी रुपये ही भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद आहे. तर, ऍपल, मायक्रोसॉफ्ट व अमेझॉन या तीन कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य 2.87 लाख कोटी डॉलर म्हणजे 201 लाख कोटी रुपये आहे.

भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. 1990 पासून भारताने 7 % जीडीपी हा वेग कायम राखण्यात यश मिळविले आहे. मात्र, तरीही अमेरिका व चीन यांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था अजूनही खूप मागे आहे. त्यासाठी विकासाला प्राधान्य देऊन कठोर आणि योग्य राजकीय व आर्थिक निर्णय घेऊन देशाला दिशा देण्याची गरज आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*