म्हणून तेज बहादूर यांचा उमेदवारी अर्ज रद्द

दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणशी लोकसभा मतदारसंघात थेट आव्हान देणाऱ्या बडतर्फ बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. दोन वेगवेगळ्या उमेदवारी अर्जामध्ये किरकोळ मात्र परस्परविरोधी माहिती दिल्याने त्यांचा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे.

मोदी यांच्या विरोधात बंडखोर जवान तेज बहादूर यांना समाजवादी पार्टीने उमेदवारी दिली होती. शालिनी यादव यांचे तिकीट कापून ऐनवेळी ही उमेदवारी देण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. तर, काहींनी तेज बहादूर यांना पाठिंबाही व्यक्त केला होता. मात्र, आता त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने येथून मोदी विरुद्ध शालिनी यादव यांच्यात थेट लढत होणार आहे.

‘भारत सरकार किंवा राज्य सरकार अधीन पद धारण करण्यादरम्यान भ्रष्टाचार किंवा अभक्तीच्या कारणामुळे पदच्युत करण्यात आले आहे का,’ या प्रश्नावर त्यांनी पहिल्या अर्जात होय म्हटले होते. तर, दुसऱ्यात त्याबद्दल स्पष्ट उल्लेख केलेला नव्हता. याच कारणाने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द केल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*