पुलवामा व राजीव गांधींचा निवडणुकीशी काय संबंध : ठाकरे

मुंबई :

आताच्या निवडणुकीत विकास या विषयावर काहीच न बोलता पुलवामा हल्ला आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा संबंध काय, असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

मोदींनी पावसात रादर वापरण्याबाबत केलेल्या वक्तव्याची खिल्ली ठाकरे यांनी उडविली. ते म्हणाले की, देशभक्तीची सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार मोदी व भाजपला कोणी दिला? पुलवामा येथे आपले जवान शहीद झाले. त्याचे काय राजकारण करताय? राजीव गांधी यांच्याबद्दल न बोलता त्यांनी विकासावर बोलायला नको? सरकारच्या चुकीच्या गोष्टीबद्दल विचारवंतांनी बोलायलाच पाहिजे. मोदी कशाचेही राजकारण करून देशाला भुलवीत असल्याचे आरोप त्यांनी पुन्हा एकदा केले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*