कर्नाटक विधानसभा राजीनाम्यावर सहा दिवसांत निर्णय

कर्नाटक :

कर्नाटकमधे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 13 आमदारांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिलेल्या आमदारांमध्ये 10 काँग्रेसचे तर तीन आमदार जेडीएसचे आहेत. त्या राजीनाम्यावर विचार करण्यासाठी कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के.आर. रमेश कुमार यांनी 13 आमदारांच्या राजीनाम्यावर सहा दिवसाचा वेळ मागून घेतला आहे. यानंतर ते निर्णय घेतील अशी माहिती मिळाली आहे.

त्यामुळे कर्नाटक सरकारला तात्पुरता का होईना पण दिलासा मिळाला आहे. 13 पैकी 6 आमदारांनीच योग्य पद्धतीने राजीनामे लिहीले आहेत. ईतर 7 आमदारांचे राजीनामे अयोग्य पद्धतीने लिहीले असल्याचे कळते आहे.
“मी जे निर्णय घेणार आहे त्याची इतिहासात नोंद होईल. त्यामुळे मी कोणतीही चूक करणार नाही. हे राजीनामे स्वेच्छेने दिले आहेत याची खातरजमा मी करणार आहे.” असं ते म्हणाले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*