नोबेल समितीचा माझ्यावर अन्याय : डोनाल्ड ट्रम्प

न्यूयॉर्क :
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा यांना पहिल्याच टर्ममध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. ते कशाला मिळाले हे त्यांनाही माहित नाही. मात्र, इतकी कामे करूनही समितीने मला हा पुरस्कार न देणे अन्याय असल्याची भावना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत झालेल्या द्वीपक्षीय बैठकीदरम्यान बोलताना ट्रम्प यांनी आपली भावना व्यक्त केली. त्यांनी म्हटले आहे की, शांततेचा नोबेल पुरस्कार न मिळणं हा आपल्यावरील अन्याय आहे. नोबेल समितीने निष्पक्षपणे पुरस्कार दिले असते तर आतापर्यंत मला अनेक गोष्टींसाठी पुरस्कार मिळाले असते.

अमेरिकेतील एएफपी या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने ‘टाइम्स नाऊ’ने याबाबत वृत्त दिले आहे. सध्या हा विषय जगभरात ट्रेंडमध्ये आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*