ट्रम्प यांनी केला चीनवर आरोप

वॉशिंग्टन :

कोरोना या संसर्गबाबतची माहिती चीनने लपवून ठेवली, असा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. चीनने योग्य वेळी ही माहिती जगाला सांगितली असती, तर इतका मोठा फटका बसला नसता. आज सगळीकडे विदारक चित्र आहे. जर याविषयी आधी माहिती असती तर कोरोनाचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी करता आली असती, असा दावा ट्रम्प यांनी केला.

कोरोनाच्या संसर्गाबाबत याबाबत यापूर्वीही डोनाल्ड यांनी आरोप केला होता. त्यावर त्यांना कडक इशारा देण्यात आला. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी चीनवर आरोप केला. आता बेछूट आरोप करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चीन काय कार्यवाही करणार हे पाहणे महत्वाचे आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*