मध्यप्रदेशात सत्तापालट, शिवराजसिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्री

भोपाळ :

ज्योतिरादित्य सिंदिया यांनी भाजपात प्रवेश केला आणि मध्यप्रदेश मध्ये मोठ्या राजकीय घडामोडी सुरू झाल्या. मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीनंतर मध्य प्रदेशमध्ये सत्तापालट झाली आहे. भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

शिवराज सिंह चौहान यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी ते थेट वल्लभ भवन येथे पोहचले. तेथे त्यांनी राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात मध्य प्रदेशमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*