रेल्वे पुन्हा चूकली रस्ता; रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार

मुंबई :

मजुरांना उत्तरप्रदेशात घेऊन निघालेली एक रेल्वे थेट ओडीसामध्ये पोहोचल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. तर विशाखापट्टणमहून कामगारांसह मुझफ्फरपूर बिहारला जाणारी रेल्वे शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पीडीडीयू जंक्शनला पोहोचल्याचे समोर आले आहे. मजुरांना आपापल्या घरी पोहोचविणाऱ्या रेल्वे रस्ता का चुकत आहेत? असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.

रात्री एक वाजता विशाखापट्टणमहून एक रेल्वे मजुरांना घेऊन मुझफ्फरपूरसाठी घेऊन जायला निघाली. रात्र असल्यामुळे प्रवाशांच्या लक्षात आले नाही की, रेल्वे कुठल्या दिशेने जात आहे. ती रेल्वे थेट पीडीडीयू जंक्शनला पोहोचली. तिथे पोहोचल्यावर स्थानिक रेल्वे प्रशासनाला हा घोटाळा कळताच त्यांना धक्का बसला. तोपर्यंत ही गोष्ट मजुरांच्या पण लक्षात आली होती. त्यामुळे त्यांनीसुद्धा रेल्वे प्रशासनाकडे बोट दाखवत अनेक प्रश्न विचारले. या रेल्वेत तब्बल १२०० मजूर होते.

तसेच या दोन्ही घटनांमुळे संकटकाळात रेल्वेने केलेले गचाळ नियोजन समोर आले आहे. लागोपाठ रेल्वे रस्ता चुकल्याच्या या घटना घडल्यामुळे रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. आता यात नेमकी ड्रायव्हरची चूक आहे?  रेल्वे प्रशासनाने त्याला त्या रूटवर जायला सांगितले होते? आता त्या मजुरांना कधी परत आणणार?

आता प्रश्न अनेक आहेत परंतु उत्तर काहीच नाही. परंतु या सगळ्या गदारोळात एक गोष्ट मात्र नक्की आहे की, रेल्वे प्रशासनाच्या नियोजनात कुठलाच ताळमेळ नाही.   

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*