संक्रमणापासून सांभाळा, गॅस्ट्रोएन्ट्रायटिस टाळा..!

उन्हाळ्यात विषाणूजन्य आजार सहजपणे पसरतात. तसेच या कालावधीत नियमितपणे जाणवणारा आणि त्रास देणारा आजार म्हणजे गॅस्ट्रोएन्ट्रायटिस. पुढील काळात याचे रुग्ण आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसतील. पोटाचा हा विकार टाळण्यासाठी त्याच्या जिवांणूंचे संक्रमण होणार नाही, याची काळजी घ्या.

या पोटाच्या त्रासदायक आजाराला ‘स्टमक फ्लू’ म्हणूनही संबोधिले जाते. रोटाव्हायरस, नोरोव्हायरस, एस्ट्रोव्हायरस यांसारख्या जीवाणू संक्रमणामुळे हा आजार होतो. याचे जिवाणू दुषित पाणी व दूषित अन्नातून शरीरात जाऊन त्यानंतर दीड-दोन दिवसांत संक्रमण पसरवतात. याद्वारे डायरियासारखे आजार आणि पुढे जाऊन बद्धकोष्टता, पाईल्स, फिशर असेही आजार होऊ शकतात. हेच टाळण्यासाठी अगोदर काळजी घ्यावी.

यामुळे होतो ‘स्टमक फ्लू’
उन्हाळ्यात आपण कमी प्रमाणात पाणी पितो. अशावेळी पाणी मिळाले नाही तर दूषित पाणी किंवा मिळेल ते कोल्ड्रिंक आपण रिचवतो. त्यातून संसर्ग होऊन असे पोटाचे आजार उद्भवतात. पोटात कालवाकालव होणे, गुडगुडणे, अस्वस्थपणा जाणवून काहीवेळी उलट्या होऊन आपली तब्बेत बिघडते. काहीवेळा तर यामुळे अशक्तपणा जाणवून ताप येतो. तसेच घसा कोरडा पडून अंथरुणही पकडावे लागते. हे टाळण्यासाठी थोडा त्रास जाणवला की लगेच वैद्यकीय
उपचार घ्यावेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*