जीन्स वापरताय, मग हे नक्की वाचा

संस्कृती आणि परंपरा यांच्यात कपडे परिधान करण्याचेही एक वेगळे शास्त्र आहे. मात्र, जागतिकीकरणाच्या झपाट्यात असे सगळे शास्त्र मागे पडून आधुनिक काळाची गरज व सोशल स्टेटस यासाठी कपड्यांची फॅशन बदलली आहे. त्यात जगभर मान्यताप्राप्त झालेली फॅशन म्हणजे जीन्स पँट. त्याचेच उपयोग व वापरण्याचे तोटेही आपण समजून घ्यायला पाहिजेत.

सुरुवातीला खाणीमधील कामगारांच्या सतत फाटणाऱ्या कपड्यांना पर्याय म्हणून जीन्स पँटचा वापर सुरू झाला. नंतर अमेरिका व युरोपात गुरे चरणाऱ्यांसाठी जीन्स हा उत्तम पर्याय ठरला. मात्र, गरीब व कष्टकरी वर्गासाठी बनविलेला हा पर्याय आता जगभरात एक फॅशन म्हणून वेगळी ओळख बनविण्यात यशस्वी ठरला आहे. जीन्स वापरणारे महिला, पुरुष व बालके आता शहरांसह गावोगावी सहजपणे भेटतात. कार्यालयातही जीन्स नियमितपणे वापरणारे आहेत. मळखाऊ
असल्याने तरुण व तरुणींमध्ये हि लोकप्रिय आहे.

त्यातही घट्ट अर्थी स्किन टाईट जीन्स घालणे हीच एक फॅशन बनली आहे. मात्र, जीन्स असो की कोणतेही कापड असो, घट्ट असल्यास त्यामुळे त्वचा व मज्जातंतू यांच्यावर दबाव निर्माण होऊन शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. घट्ट कापड घातल्याने नकारात्मकता आणि अस्वस्थता वाढू शकते. तसेच याचा नियमितपणे वापर केल्यास त्यातून पाय कमजोर होऊ शकतात. त्यामुळेच जीन्स पँट घालताना किमान ती मोकळी-ढाकळी असावी, याकडे लक्ष द्या.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*