मग फूड पॉइझनिंग होणारच की..!

पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात हवेतील उष्णता व बाष्प यामुळे सगळ्यांवरच परिणाम होतात. अशावेळी अन्न तातडीने खराब होते. त्यामुळेच या ऋतूंसह शक्यतो नियमितपणे बाहेरील अन्नपदार्थ खाण्याचे टाळा. घरी बनविलेले ताजे किंवा फ्रिजमध्ये योग्य पद्धतीने ठेवलेले अन्नपदार्थ खाण्यास काहीच हरकत नाही. मात्र, आपण कुठलेही आणि ताजे नसलेले अन्नपदार्थ खाल्ल्यावर फूड पॉइझनिंग अर्थात अन्नातून होणारी विषबाधा ठरलेली असेल.

उन्हाळा म्हटले की उकाडा आणि त्यामुळे शरीराला येणार घाम, घामाची दुर्गंधी आणि त्वचेचा चिकटपणा हेही आपोआप येतात. त्यासोबत वेगवेगळे आजारही आपला पिच्छा पुरवितात. उकाडा व उष्णतेच्या त्रासापासून बचाव म्हणून आपण मग अनेकदा ताक, लस्सी, दही, शीतपेय यांच्या वाटेल जातोच. त्यातूनही आपल्याला विषबाधा होऊ शकते.

याबद्दल सल्ला देणे सोपे असले तरीही धकाधकीच्या जीवनात व प्रवासात आपल्याला अनेकदा बाहेरील ऍन व शीतपेय यांचा आधार घ्यावाच लागतो. मात्र, अशावेळी स्वच्छता असलेल्या आणि ताजे पदार्थ देणाऱ्या हॉटेल किंवा उपाहारगृहात जाऊन आपण पेटपूजा करावी. त्यासाठी थोडा जास्त खर्च आला तरीही हरकत नाही. कारण त्यातूनच आपला वैद्यकीय उपचाराचा खर्च आणि आजारी पडल्यावर जाणारा वेळही वाचणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*