शिपी आमटी : कर्जतचा गावरान तडका

महाराष्ट्र म्हणजे खाद्य संस्कृतीने सर्वांना आनंद वाटणारा प्रदेश. येथील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुकतील शिपी आमटी हा अस्सल गावरान झटका देणारा खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे. तो बनविण्याची साधी व सोपी पद्धत आहे. मात्र, एकदा या आमटीची चव चाखलेला पुन्हा-पुन्हा खाण्यासाठी आतुर होणार हे निश्चित.

यासाठी लागणारे पदार्थ :
एक वाटी उकडलेली तूर डाळ, उकडलेले मूग अर्धी वाटी, अर्धी वाटी हरभरे व उडीद डाळ, कांदा, आले व लसूण यांची एक चमचा पेस्ट, हिंग, मोहरी, हळद व धन्याची पूड एक चमचा, दोन चमचे किसलेले खोबरे, गरजेनुसार कढीपत्ता, काळा मसाला, लाल तिखट मिरची पूड, मीठ, तेल, कोथिंबीर (बारीक चिरलेली) व पाणी आदी.

पाककृती :
सर्व कडधान्यांचे मिश्रण एकजीव करून घेऊन त्याची पेस्ट करून योग्य प्रमाणात पाणी घालून ठेवावे. कढईत उरलेले इतर सर्व मसाल्याचे पदार्थ एकजीव करून घेऊन फोडणी द्यावी. कांदा परतून झाल्यावर त्यात डाळींचे मिश्रण घालून योग्य प्रमाणात पाणी घालावे. आमटीला चांगली उकळी येऊन द्यावी. मग गरमागरम ज्वारी, बाजरी भाकरी किंवा हा पर्याय उपलब्ध नसल्यास चपातीबरोबर कुस्करून (काला करणे) खावी. समवेत कांदा किंवा कांदा पात काकडी खाण्यासाठी असल्यास उत्तम…

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*