चुलीवरचे खा, तंदुरुस्त राहा

सध्याचा शहरी भागातील परवलीचा शब्द म्हणजे चुलीवरचे खाद्य. अस्सल ग्रामीण ढंगाची चव पुन्हा जिभेवर रुजविणाऱ्या या चुलीवरील जेवणाला पुणे, मुंबई व शहरी भागात मोठी मागणी आहे. मात्र, तरीही याची चव घेताना अस्सल ग्रामीण ढंगाची चव न मिळाल्याची बोच अनेकांना असते. कारण प्रत्येक ठिकाणचे आणि तेथील महिलांच्या स्वयंपाकाचे काहीतरी खास वैशिष्ट्ये असते. शहरात मात्र तीच चव व तोच तोंडाचा फटकारा घालवणारा प्रकार शक्यतो खायला मिळत नाही.

तरीही आहे त्यात समाधान मानून नसल्यापेक्षा बरे, या विचाराने शहरात चुलीवरचे भाजीचे प्रकार मोठ्या प्रमाणात आब राखून आहेत. चुलीवर रटरटून शिजलेले अन्न खाणे म्हणजे खऱ्या अर्थाने तंदुरुस्त राहण्यासाठीची सुरुवात आहे. मटण आणि शिपी किंवा कटाची आमटी यासह अनेक पदार्थ चुलीवर शिजवून खाण्याची मजाच और आहे. पूर्ण शिजलेले अन्न खायला न मिळाल्याने प्रकृती बिघडते. अशावेळी चुलीवर जास्त कालावधीसाठी शिजलेले अन्न पचण्यास हलके असल्याने अजिबात त्रास होत नाही. मात्र, तरीही असे चुलींच्यावरचे जेवण खातानाही त्यात जास्त मसाले व तिखट यांचा अतिरेक टाळावा. नाहीतर त्यानेच आपली तब्बेत बिघडू शकते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*