मधुमेही मंडळींनो, नक्की खा जवसाचे लाडू

जवस हा दुर्मिळ मात्र औषधी घटक असलेला एक उत्तम गळितधान्य प्रकार आहे. शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित करणारा घटक म्हणून जवसाच्या आयुर्वेदात स्थान आहे. याचेच लाडू खाऊन मधुमेही मंडळी गोड चवीचा थोडाफार नियंत्रित आस्वाद घेऊ शकतात.

यासाठी लागणारे साहित्य :

जवस दोन वाट्या, अर्धी वाटी गुळ व ओट्स पीठ, बदामाचे तुकडे, तीन चमचे तीळ, चवीसाठी वेलची पूड, साजूक तुप तीन-चार चमचे आदी.

पाककृती :

जवस खमंग भाजून घेतल्यानंतर मिक्सरवर बारीक करून घ्यावे. यामध्ये तुपात भाजलेले ओटस पीठ, भाजलेले तीळ हे सर्व मिश्रण कोमट तुपात एकजीव करा. गुळाचा एकतारी पाक करुन त्यात आधीच्या मिश्रणात ओता. त्यावर वेलची पूड टाकून लगेच लाडू बांधा. असे लाडू ४-५ दिवस सहजपणे टिकतात. तसेच फ्रिजमध्ये ठेवल्यास ८-१० दिवसही हे स्वादिष्ट लाडू टिकतात.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*