म्हणून नक्की खा द्राक्ष : १० कारणे

आंबट-गोड चवीची द्राक्ष आता बाजारात विकायला येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या याचे भावही जास्त आहेत. मात्र, पुढच्या पंधरवड्यात या फळाचे भाव सर्वसामान्यांच्या आटोक्यात येतील अशावेळी द्राक्ष खायची एकही संधी सोडू नका. कारण, हे एक बहुगुणी व आरोग्यदायी असे फळ आहे.

हे फळ खाण्याची काही महत्वाचे कारणे अशी : 1. द्राक्षामधील जीवनसत्वे आपल्या शरीराची ताकद आणि कार्यक्षमता वाढवितात. २. दिवसातून रोज दोनदा द्राक्ष रसाचे (३-४ चमचे) सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते. ३. तसेच मुलांची बुद्धी तल्लख होते. ४. यातील थंडाव्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन आल्हाददायक वाटते. ५. मूत्राशयाचे आजार व जॉइंट पेनची समस्या कमी होते. ६. रक्त पातळ व शुद्ध होण्यास मदत होते. ७. किडनी स्टोन असल्यास रोज सकाळी २५० ग्राम द्राक्षरस पिल्याने खडा पडण्यास मदत होते. ८. पोटातील उष्णता कमी करण्यासाठी द्राक्ष रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी अनुशापोटी खावेत. ९. तोंड आलेले असल्यास द्राक्ष रसाच्या गुळण्या कराव्यात. १०. लहान मुलांना दात येताना होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी द्राक्ष रसात मध मिक्स करून तो चाटावा.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*