असा आहे कोहलीचा फिटनेस मंत्र

विराट कोहली म्हटले की लुकडा-सुकडा परंतु परकीय गोलंदाजांची पिसे काढणारा फलंदाज असेच चित्र आपल्यासमोर येते. होय, त्याने आपल्या शैलीदार आणि आक्रमक फलंदाजीच्या जीवावर जगभरात नावलौकिक मिळवला आहे. मात्र, त्यामुळेच त्याचा फिटनेस मंत्र समजून घेण्याची उत्सुकता तरुणांसह तरुणींनाही आहेच. मग वाचा त्याच्या फिटनेसचे रहस्य…

वेगन डायट (vegan diet) नावाच्या आहाराचा विराट कोहली फोलोअर आहे. या आहारात दुध आणि अंडीही वर्ज्य असतात. मात्र, प्रोटीनयुक्त अन्नपदार्थ, मिल्कशेक आणि सोयाबीनचे पदार्थ यांचा या आहारात समावेश असतो. तसेच फळे, भाजीपाला, मोड आलेले कडधान्य आणि इतरही शाकाहारी गोष्टी यामध्ये असतात. ब्रेड आणि चॉकलेट यांनाही विराटने आहारातून वर्ज्य केले आहे.

भरपूर व्यायाम करतानाच ताजे अन्न आणि त्याला अधिक प्रथिनयुक्त आहार याची जोड देऊन हा जगप्रसिद्ध फलंदाज भारताला विजय मिळवून देत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*