हवेत असलेल्या हुकुमशाहीला जमिनीवर आणा : राष्ट्रवादी

भिवंडी :
देशात सध्या हुकूमशाहीचा जोर आहे. मात्र, भारतीय जनता सुज्ञ असून हवेत असलेल्या या हुकूमशाहीला ती नक्की जनतेवर आणेल. त्यासाठी विचारी माणसांना एकजुटीने काम करावे लागणार असल्याची हाक राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे.

येथील परिवर्तन यात्रेच्या कार्यक्रमात बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व छगन भुजबळ या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भुजबळ म्हणाले की, भाजप सरकार हवेत आहे. या सरकारला जमिनीवर आणण्याचे काम करण्यासाठी सज्ज व्हा. विकासाचा मुद्दा बाजुला ठेवुन सरकार मंदिर-मस्जिदीच्या मुद्याचा धंदा करीत आहे. राम-रहीम यांच्यात भांडणे लावणाऱ्यांना सत्तेतून जनता नक्की पायउतार करणार यात शंका नाही.

देशात हुकुमशाही आलेली आहेच. तिला ब्रेक लावण्यासाठी आगामी निवडणूका महत्वाच्या आहेत. भाजप मागच्या दाराने आणीबाणी आणतानाच असहिष्णूतेचे वातावरण निर्माण करीत आहे, अशी टीका अजित दादा यांनी केली.

वाढत्या महागाईमुळे जगणं मुश्किल झाले आहे. ग्राहक आणि शेतकरी समाधानी नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांला आम्ही अडचणी येवू दिले नाही. त्यांना कर्जमाफी दिली, अडचणीला धावून गेलो परंतु हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे असा आरोपही अजितदादा पवार यांनी केला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*