पवारांच्या उमेदवाराच्या कर्तबगारीवर विखेंचा प्रश्न..!

अहमदनगर :

शेवगाव येथील कार्यक्रमात बोलताना युवा नेते सुजय विखे यांनी आघाडीकडून चर्चेत असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर प्रश्न उपस्थित केला आहे. ‘त्यांची कर्तबगारी काय’, असे विचारताना त्यांनी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यातर्फे दिलेल्या उमेदवारीला आव्हान दिले आहे.

निंबे नांदूर येथील कार्यक्रमात पुन्हा एकदा काँग्रेस किंवा उमेदवारी नाहीच मिळाली तर अपक्ष लढण्याची गर्जना राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांनी केली. ते म्हणाले की, नगर दक्षिण मतदारसंघात अनेकांची नावे चर्चेत आहेत. पण आता निवडणुकीला फक्त दोन महिनेच उरलेत. त्यात हे कर्तबगार म्हणवणारे नेते मतदारांपर्यंत पोहचतील का, असेही त्यांनी विचारले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*