‘घर सांभाळणाराच देश चांगला सांभाळेल’

नागपूर :

दररोज नवे लोक भेटतात आणि भाजपला आयुष्य समर्पित करण्याचे बोलतात. पण जो घर चांगले सांभाळू शकतो, तोच देश उत्तम सांभाळू शकतो, याचे भान ठेवा, असे आवाहन भाजपचे नेते व केंद्र सरकारच्या टीममधील सर्वाधिक कार्यक्षम मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्यांनी कुटुंब आणि देश सांभाळणे याची योग्य पद्धतीने सांगड घालून अभाविपसह देशालाही एक स्पष्ट आणि दिशादर्शक विचार सांगितला आहे. ते म्हणाले की, आधी आपलं घर सांभाळावे आणि मग पक्षासाठी व देशासाठी वेळ देण्याबद्दल बोलावे.

भाजपमध्ये अनेकांनी घरावर तुळशीपत्र ठेऊन देत पक्ष व हिंदुत्ववादी विचार पसरविण्यासाठी काम केलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह असे हजारोजण सध्या भाजपत आहेत. त्यांचाबद्दल सांगताना याचे दाखलेही अनेकजण देतात. त्याचवेळी गडकरी यांनी मात्र कुटुंब आणि देश सांभाळण्याच्या जबाबदारीचे भान देऊन पक्षाला सन्मार्गाने चालण्याचा संदेश दिल्याबद्दल अनेकांनी गडकरी यांचे सोशल मिडीयावर कौतुक केले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*