शेवगा खातोय बाजारात भाव

पुणे :

मागणीच्या तुलनेत पुरवठ्यावर परिणाम झाल्याने सध्या बाजारात शेवगा शेंगा जोरदार भाव खात आहेत. मार्केट यार्डमध्ये शेवग्याला ३५ ते ४५ रुपये किलोचा भाव मिळत असतानाच किरकोळ विक्रीसाठी याचे भाव सध्या ४० ते ६० रुपये आहेत.

मुंबई मार्केट कमिटीत आज शेवग्याच्या शेंगांची फ़क़्त १८७ क्विंटल आवक झाली. येथे या शेंगाना ३६ ते ४६ रुपये किलोचा भाव मिळाला. तर, पुणे येथील गुलटेकडी मार्केटमध्ये शेंगांची ७९ क्विंटल आवक झाल्याने याचे भाव २५ ते ४५ रुपये होते. राज्यभरातील इतर बाजार समितीमधील शेवगा शेंगांचे प्रतिकिलोचे भाव असे : पुणे-मोशी ३०-४०, जळगाव ३५, कराड ३५-४०, सातारा ३०-५०, श्रीरामपूर ४०-५५, खेड-चाकण ४०-५० आदि.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*