
शिर्डी :
या आरक्षित लोकसभा मतदारसंघात सध्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी अजूनही चर्चेत नसतानाच भाजप-शिवसेना युतीतर्फे येथून कोणाला उमेदवारी मिळणार याची जोरदार चर्चा आहे. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात असलेली नाराजी लक्षात घेऊन आघाडीच्या जागावाटपाचा तिढा कायम आहे. त्यातूनच येथून सामोपचाराने उमेदवारी मिळविण्यासाठी माजी प्रशासकीय अधिकारी नितीन उदमले यांच्या गटाने कंबर कसली आहे.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीतील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर पिचड असे दिग्गज असूनही शिर्डी मतदारसंघात आघाडीचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही. त्यातच येथून भाजपचे इच्छुक उदमले व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे.
वाकचौरे यांनी ग्राउंड तयार करण्यास सुरुवात केलेली असतानाच उदमले यांनी त्यांना जोरदार आव्हान निर्माण केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून उदमले यांनी येथे लोकसंपर्क वाढविला आहे. स्थानिक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती आणि वाढता जनाधार आता वाकचौरे व लोखंडे गटात चिंतेचा विषय बनला आहे. मात्र, येथील शिवसेना व उद्धव ठाकरे हे उदमले यांना उमेदवारी देण्यात कितपत स्वारस्य दाखविणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Be the first to comment