पवार साहेबांना घेरण्याचा मास्टर प्लॅन..!

अहमदनगर :

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना यंदाच्या निवडणुकीत बारामतीत किंवा त्यांनी निवडणूक लढविल्यास माढा (जि. सोलापूर) येथेच घेरण्याचा मास्टर प्लॅन भाजपने केला आहे. तो कितपत यशस्वी होणार हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर समजेल.

365 दिवस आणि 24×7 निवडणूकमय असलेल्या मोदी-शाह यांच्या भाजपने आता राष्ट्रीय पातळीवर प्रचारात आघाडी घेतली आहे. काहीही करून सरकार रिपीट करण्याचा मास्टर प्लॅन तयार आहे. त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्रातील पवार साहेबांना स्थानिक पातळीवर घेरण्याची व्यूहरचना भाजपने बनविली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपचे मंत्री विधान करीत आहेत.

देशात काँग्रेस पक्षासह पवार साहेबांची ताकद मोठी आहे. त्याचीच धास्ती भाजपसह संघालाही आहे. त्यामुळेच काहीही करून यंदा पवार साहेब यांना वेसण लावण्याची तयारी म्हणून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीम कामाला लागली आहे. त्यात या टीमला कितपत यश मिळते हे निवडणूक निकालानंतर समजणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*